नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बेघरांना आसरा देण्यासाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील बेघर आणि निराधार नागरिकांना निवारा मिळावा हा यामागचा उद्देश आहे. 15 मार्च 2024 पासून प्लॉट क्रमांक 240, सेक्टर 4, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या बेघर निवारा केंद्राची इमारत तीन मजली असून 103 लोकांना राहण्याची क्षमता आहे. तीन मजल्यांमध्ये पहिला मजला पुरुषांसाठी, दुसरा मजला महिलांसाठी आणि तिसरा मजला कुटुंबांसाठी आहे.
या निवारा केंद्रामध्ये बेघर व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच त्यांना वेळोवेळी समुपदेशनही केले जाते. यामध्ये त्यांना त्यांच्या आवडीनुसार बेघर निवारा केंद्रात आणले जाते. बेघर असलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा, चहा, नाश्ता व दुपारचे जेवण, आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी मोफत दिले जाते.
नवी मुंबई शहर महानगरपालिकेच्या वतीने आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेमार्फत बेघर निवारा केंद्र चालवले जात आहे.
मात्र, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेघर व्यक्ती (वृद्ध, महिला, लहान मुले, अपंग) रस्त्यावर आढळल्यास तुषार पवार यांच्याशी 9881636168 व राहुल वाढे 8669393306 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
हेही वाचा