Advertisement

शिर्डीतील दर्शनाच्या वेळेत बदल, आता ‘या’ वेळेतच भाविकांना प्रवेश

शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांच्या दर्शनासाठी नवीन वेळेची घोषणा केली आहे. दर्शनाच्या वेळेसोबत इतर काही निर्बंध देखील भाविकांसाठी नव्याने घालण्यात आले आहेत.

शिर्डीतील दर्शनाच्या वेळेत बदल, आता ‘या’ वेळेतच भाविकांना प्रवेश
SHARES

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या पुन्हा वाढू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांच्या दर्शनासाठी नवीन वेळेची घोषणा केली आहे. दर्शनाच्या वेळेसोबत इतर काही निर्बंध देखील भाविकांसाठी नव्याने घालण्यात आले आहेत.

श्री साईंबाबा संस्थानने ठरवलेल्या नवीन वेळेनुसार आता साई भक्तांना सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा- ठाण्यात उभारले शिवरायांचे जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट

त्याचसोबत सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तांसाठी बंद असेल, गुरुवारची पालखी देखील बंद असेल, गुरुवार-शनिवार-रविवार आणि उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येईल, असे काही निर्बंध गर्दी होऊ नये म्हणून भाविकांवर टाकण्यात आले आहेत. 

दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावतीसह इतर विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे, असं सांगितलं आहे. तसंच गर्दी वाढत असल्याने राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

(new timing for shirdi sai baba temple devotees due to night curfew and covid 19)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा