Advertisement

शिवजयंतीनिमित्त भाईंदर-दादर-वाशी प्रवास करणारा अवलिया


शिवजयंतीनिमित्त भाईंदर-दादर-वाशी प्रवास करणारा अवलिया
SHARES

भगव्या रंगाची सायकल, सायकलवर स्वार गृहस्थांचा पेहरावही भगवा... सायकलला पुढच्या बाजूला छत्रपतींचा फोटो आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतिक समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा फडकणारा झेंडा... यासोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या पोस्टरसह एक संदेश...

बाईकस्वारांच्या आणि इतर गाड्यांच्या गर्दीत भर उन्हात सायकल चालवणारे हे गृहस्थ नजरेस पडले. मग काय गाडी साईडला थांबवून त्यांच्याशी बोलण्याचा मोह काही आवरता आला नाही.

यांचं नाव आहे दत्ता परुळेकर... वय ६० वर्ष... शिवजयंतीनिमित्त दत्ता परुळेकर यांनी भाईंदरवरून सुरू केलेला प्रवास दादरच्या शिवाजी पार्क त्यानंतर वाशी असा आणि मग पुन्हा भाईंदर असा असणार आहे.

भर ऊनात सायकल कशी चालवता असं विचारल्यावर दत्ता परुळेकर हसत हसत म्हणाले, ज्या राजानं महाराष्ट्राला घडवलं त्यांच्यासाठी काय पण... बस त्यांच्या या वाक्यातच सर्व काही आलं.  



हेही वाचा

ओलांडून उंबरठा, 'या' मराठी उद्योजिकांनी शोधल्या नव्या वाटा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा