Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ कायम


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ कायम
SHARES

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही १०० रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे ९५ रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. दररोज सकाळी ६ च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा ९९.३५ रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत ९९.०३ रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर ८८.९९ रुपये इतका आहे.

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली : ९१.१७ रुपये प्रतिलिटर

मुंबई : ९७.५७ रुपये प्रतिलिटर

कोलकाता : ९१.३५ रुपये प्रतिलिटर

चेन्नई : ९३.११ रुपये प्रतिलिटर

नोएडा : ८९.२३ रुपये प्रतिलिटर

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा