Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

प्रथमच मराठीतून होणार 'आरबीआय'ची परीक्षा

यंदा प्रथमच राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळं रिझर्व बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) 'हजेरीसहायक' या पदासाठीच्या परीक्षेत मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

प्रथमच मराठीतून होणार 'आरबीआय'ची परीक्षा
SHARES

देशपातळीवरील अनेक परीक्षा आतापर्यंत इंग्रजी व हिंदी भाषेत देण्यात आल्या आहेत. मात्र, यंदा प्रथमच राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळं रिझर्व बँक ऑफ इंडियानं (rbi) 'हजेरीसहायक' या पदासाठीच्या परीक्षेत मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 'आरबीआय'नं ८४१ हजेरीसहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडंच दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे.

या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येणार आहेत. परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागानं मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आलं आहे. 'आरबीआय'मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.

हजेरीसहायक पदाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ही परीक्षा १२० गुणांची असून परीक्षार्थींना ९० मिनिटं मिळतील. भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा ९ व १० एप्रिल रोजी देशातील १७३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्यानं परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केलं.

परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. तसंच, मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा