Advertisement

'अरुणाच्या निमित्ताने' पुस्तकाचे प्रकाशन


'अरुणाच्या निमित्ताने' पुस्तकाचे प्रकाशन
SHARES

परळ - केइएम रुग्णालयातील परिचारिकांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेले लोकवाङ्मय गृह लिखित 'अरूणाच्या निमित्ताने' या पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवारी करण्यात आलं. केइएममधील ओल्ड नर्सेस हॉस्टेलमध्ये अधिसेविका अरूंधती वेल्हाळ यांच्य हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी परिचर्या विभाग प्राचार्य पूर्वा खंदारे, लेखिका सुनिता कुलकर्णी, सीमा केतकर, केईएम रुग्णालय अधिष्ठाता डॉ. एच.डी. ग्वालानी आदी मान्यवर उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार यावर 2013 सालापासून प्रशासनाने सक्षम कायदा केला. मात्र अरूणा शानबाग यांच्याबाबत 1973 साली जी घटना घडली त्यावेळी त्यावेळी कायदा सक्षम नसल्यानं आरोपीला केवळ सात वर्षांची शिक्षा झाली. आजही महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी नाहीत. मात्र 'महिलांसाठी महिला विकास कक्ष' सुरक्षेच्या उद्देशानं स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने जागृत राहून कायद्याचा फायदा करून घेणे गरजेचे असल्याचं मत प्राचार्य पूर्वा खंदारे यांनी व्यक्त केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा