Advertisement

वरळी सिलिंडर स्फोट प्रकरण : ५ वर्षांच्या विष्णूला शिवसेनेनं घेतलं दत्तक

वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक तीनमधील एका घरात डिसेंबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता.

वरळी सिलिंडर स्फोट प्रकरण : ५ वर्षांच्या विष्णूला शिवसेनेनं घेतलं दत्तक
(Twitter/@ANI)
SHARES

वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या विष्णू पुरी या ५ वर्षांच्या लहान मुलाला सीएसआर निधी व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातर्फे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक तीनमधील एका घरात डिसेंबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. यात विष्णू पुरी याचे वडील आनंद पुरी (२७), आई विद्या पुरी (२५) आणि भाऊ मंगेश पुरी (४ महिने) यांचा मृत्यू झाला. स्वतः विष्णू या स्फोटात गंभीर जखमी झाला होता.

मंगळवारी कस्तुरबा रुग्णालयात महापौरांनी विष्णूच्या आजोबांकडे ही मदत सुपूर्द केली. विष्णूचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शिवसेना करणार आहे. स्वतः विष्णू या स्फोटात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सातरस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते.

विष्णूचे आईवडिलांचे छत्र हरपल्याने हाल होऊ नयेत म्हणून ही मदत करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याप्रसंगी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार उपस्थित होते.

वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक तीनमधील एका घरात डिसेंबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात विष्णू पुरी याचे आई, वडील आणि भाऊ यांचा मृत्यू झाला.

विष्णूने आपले पुण्यातील आजोबा यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विष्णूच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आहे. संपूर्ण आर्थिक मदत या खात्यामध्ये जमा होणार आहे.

विष्णू वयाची १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्याच्या देखभालीचा खर्च मिळणाऱ्या व्याजातून करण्यात येईल. याव्यतिरिक्त दर महिन्याला 'सीएसआर'मधून विष्णूला आर्थिक मदत करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रला पत्र देणार असल्याचं महापौरांनी सांगितलं.

विष्णूला आई-वडिलांसारखेच प्रेम द्या, चांगला सांभाळ करा, असे आजोबांना सांगत आम्ही वेळोवेळी त्याला भेटून त्याची संपूर्ण काळजी घेणार असल्याचे महापौर म्हणाल्या. महापौरांनी विष्णूला कपडे व खेळण्याचे साहित्य दिले.

कस्तुरबा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला यश येऊन विष्णू बरा झाला आहे. त्याच्यावर पाच ते सहा वेळा

प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. या लहान बाळाची चांगली सुश्रुषा केल्याबद्दल महापौरांनी रुग्णालयातील सर्व संबंधितांचे आभार मानले.



हेही वाचा

सहा महिने वृद्धाश्रमात सेवा करण्याची अनोखी शिक्षा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा