Advertisement

बाप्पांच्या दागिन्यांचा लिलाव 25 डिसेंबरला


बाप्पांच्या दागिन्यांचा लिलाव 25 डिसेंबरला
SHARES

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा वर्षातून 4 वेळा लिलाव केला जातो. सालाबादप्रमाणे यंदाही देवदीपावलीच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात अर्पण केलेल्या गणेशाच्या प्रतिमा, लॉकेट्स, दुर्वा, अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, हार असे अनेक दागिने या लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे मंदिर न्यास समितीने हा लिलाव रद्द केला होता. 


लिलाव 25 डिसेंबरला

आता हा लिलाव 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले काही अलंकार सकाळी 9 वाजल्यापासून मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.


गणेश भक्तांची होणार गर्दी

सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव वर्षातून चार वेळा शुभ मुहूर्त बघून केला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने जपली आहे. गणेश भक्त नेहमीच या लिलावाला गर्दी करतात.

या लिलावाच्या माध्यमातून मिळणारे पैसे मंदिर न्यास समिती सर्वसामान्य गरजू, रुग्ण आणि विद्यार्थी यांना देणगीच्या स्वरूपात देते. या लिलावासंदर्भातील सर्व अधिकार न्यास समितीने राखून ठेवलेले आहेत. सोमवार 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात गणेश भक्तांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.



हेही वाचा - 

सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव स्थगित


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा