Advertisement

महापरिनिर्वाण दिन: आंबेडकर अनुयायींसाठी रेल्वेची विशेष तयारी

विशेष फेऱ्या व गाड्यांसोबत रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर माहिती केंद्र सुरू केले आहेत.

महापरिनिर्वाण दिन: आंबेडकर अनुयायींसाठी रेल्वेची विशेष तयारी
SHARES

डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर हजेरी लावत आहेत. या सर्व अनुयायींची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळ, बेस्ट उपक्रम, महापालिका, रेल्वेप्रशासन यांनी विविध सुविधा पुरविल्या आहेत. तसंच, रेल्वेनं विशेष गाड्याही सोडल्या आहेत. मात्र, विशेष फेऱ्या व गाड्यांसोबत रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर माहिती केंद्र सुरू केले आहेत. 

विशेष व्यवस्था

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर ते डिसेंबरपर्यंत विशेष व्यवस्था पुरविण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, दादर, अंधेरी, माहिम आणि बोरीवली स्थानकांत अनुयायींसाठी मदत केंद्र सुरू केले आहेत. या माहिती केंद्रांवर २४ तास मराठी व हिंदी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या नियोजनासाठी आरपीएफ/जीआरपी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अतिरिक्त तिकीट खिडकी

परतीच्या प्रवासावेळी तिकीटांच्या आरक्षणासाठी आणि आरक्षण रद्द व रिफंड करण्यासाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त तिकीट खिडकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर, माहिम आणि बोरीवली स्थानकांवर एटीव्हीएम सहायता कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसंच, चर्चेगेट ते बोरीवली स्थानकांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून, या केंद्रात २४ तास डॉक्टर आणि सहायता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.हेही वाचा -

बीआयटी चाळीतील डाॅ. आंबेडकरांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीची क्लीनचिटRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा