Advertisement

राष्ट्रपती रामनाथ कोविंद २८ नोव्हेंबरला मुंबईत


राष्ट्रपती रामनाथ कोविंद २८ नोव्हेंबरला मुंबईत
SHARES

सांताक्रूझ येथील जगातील पहिल्या 'योगा' संस्थेला २५ डिसेंबर २०१८ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या संस्थेच्या वतीने २८ डिसेंबर रोजी 'सद्भाव उत्सव'चं आयोजन करण्यात आलं आहे. या 'सद्भाव उत्सव'चं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या उत्सवाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगा इंस्टीट्यूट (मुंबई) चे संचालक डॉ. हंसाजी जयदेव सहभागी होणार आहेत.


कुठं होणार कार्यक्रम?

या कार्यक्रमाचं आयोजन वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी)च्या 'एमएमआरडीए' मैदानात करण्यात आलं आहे. २८ आणि २९ डिसेंबर असे २ दिवस १२ ते ९ या वेळेत आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवासाठी प्रवेश मोफत असणार आहे.


संगीत सादरीकरण

या उत्सवात संगीत, मनोरंजन, खाण्याचे पदार्थ तसंच, कलात्मक वस्तू ठेवण्यात येणार आहे. तसंच, या उत्सवात सिम्फनी स्टेज आमि म्युजिकल बॅंड आपलं संगीत सादर करणार आहेत. यामध्ये शंकर महादेवन, सुखविंदर सिंह, रेखा भारद्वाज यांसह अनेक गायक आणि राॅक बॅंड्स यांत सहभागी होणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा