IIT च्या चालू वर्गात घुसली गाय!

आयआयटी मुंबईतील एका वर्गात लेक्चर सुरू असताना अचानक मोकाट गाय घुसल्याची घटना घडली. शनिवारी ही घटना घडली असून गाय घुसल्यानं विद्यार्थी आणि प्राध्यापकांची एकच तारांबळ उडाली.

SHARE

आयआयटी मुंबईतील एका वर्गात लेक्चर सुरू असताना अचानक मोकाट गाय घुसल्याची घटना घडलीशनिवारी ही घटना घडली असून गाय घुसल्यानं विद्यार्थी आणि प्राध्यापकांची एकच तारांबळ उडालीमात्रया गाईनं कोणावरच हल्ला न केल्यामुळं मोठी जीवितहानी टळली. याआधी आयआयटी मुंबई परिसरात वळुच्या धडकेत विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती.


अचानक गाय घुसली

आयआयटी मुंबईतील एका वर्गात प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत होतेत्यावेळी वर्गात अचानक गाय घुसलीवर्गात गाय आल्यानं विद्यार्थी आणि प्राध्यापकाच्या मनात धडकी भरलीवर्गात आल्यानंतर गाय सर्वत्र फिरू लागल्यानं विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरणं निर्माण झालं होतं.

गोठा बांधण्याचं काम

अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर गाईला वर्गाबाहेर काढण्यात आलं. त्यानंतप प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेदरम्यान, आयआयटी मुंबई परिसरात मोकाट गाईंच्या प्रमाणात वाढ झाली आहेत्यामुळं या गाईंना एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी गोठा बांधण्याचं काम आयआयटीतर्फे हाती घेण्यात येणार आहे.हेही वाचा -

राष्ट्रवादीला नवी मुंबईतही खिंडार, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर?

प्रभादेवी स्थानकात उभारणार ६ मीटर रुंदीचा नवा पूलसंबंधित विषय
ताज्या बातम्या