Advertisement

आधारप्रमाणे मतदान ओळखपत्रही होणार डिजिटल

निवडणूक आयोगाच्या या सुविधेमुळे नवीन मतदार इंटरनेटवरून आपले मतदान कार्ड डाउनलोड करू शकतील. तसंच डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मताधिकार बजावू शकणार आहेत.

आधारप्रमाणे मतदान ओळखपत्रही होणार डिजिटल
SHARES

म्हणजेच मतदान ओळखपत्र आता आधार कार्डप्रमाणे डिजिटल स्वरुपात ठेवता येणार आहे. कागदी कार्ड देखील मतदारांना बाळगता येणार आहे. निवडणूक आयोग लवकरच मतदान ओळखपत्र डिजिटल स्वरुपात घेऊन येणार आहे.

हेल्पलाइन अॅपच्या माध्यमातून केवायसी केल्यानंतर मतदान ओळखपत्र डिजिटल स्वरुपात मिळेल. मतदारांना ‘इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड’ (इपीआयसी) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणे हे निवडणूक आयोगाचे उद्दीष्ट आहे.

निवडणूक आयोगाच्या या सुविधेमुळे नवीन मतदार इंटरनेटवरून आपले मतदान कार्ड डाउनलोड करू शकतील. तसंच डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मताधिकार बजावू शकणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी होणारी दिरंगाई आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या चालू मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात ईपीआयसी डाउनलोड करू शकणार आहेत.



हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा