Advertisement

टाटा मुंबई मॅरेथाॅनला 'गोल्ड लेव्हल'


टाटा मुंबई मॅरेथाॅनला 'गोल्ड लेव्हल'
SHARES

आंतरराष्ट्रीय अॅथलेटीक्स महासंघा(आयएएएफ) ने टाटा मुंबई मॅरेथाॅनला 'गोल्ड लेव्हल' दर्जा दिला आहे. हा दर्जा मिळवणारी 'मुंबई मॅरेथाॅन' ही भारतातील एकमेव स्पर्धा ठरली आहे. मॅरेथाॅनचं आयोजन करणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनलने शनिवारी यासंबंधीची घोषणा केली.


सर्वोत्तम स्पर्धांमध्ये समावेश

टाटा मुंबई मॅरेथाॅनचा जगातील १० सर्वोत्तम मॅरेथाॅनमध्ये समावेश होतो. ४,०५,००० डाॅलर चा पुरस्कार असणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन २० जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. एकूण ६ विभागांमध्ये ४६ हजारहून अधिक स्पर्धक या मॅरेथाॅनमध्ये सहभागी होतात.


कसं दिलं जातं गोल्ड लेव्हल?

काटेकोर मापदंडाच्या आधारे कुठल्याही स्पर्धेला 'आयएएएफ'कडून गोल्ड मेडल दिलं जातं. या मापदंडामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्ड रिप्रेझेंटेशन, महिला-पुरूष स्पर्धकांसाठी वेगवेगळा पुरस्कार, वैद्यकीय सुविधा, लाइव्ह टेलिव्हिजन कव्हरेज इत्यादींचा समावेश असतो.

यासोबतच गोल्ड लेव्हल मिळवण्यासाठी मॅरेथाॅनमधील स्वच्छता, ट्रॅकचा दर्जा, वाहतूक नियंत्रण, स्पर्धकांची सुरक्षा इत्यादी बाबींचाही समावेश असतो.



हेही वाचा-

विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

अाशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवकडे भारताचे नेतृत्व



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा