Advertisement

अवघ्या १६व्या वर्षी तयार केला संगणक


SHARES

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. हे जयंत परब याला पाहून नक्कीच पटते. अवघ्या १६ व्या वर्षी या मुलाने घरी संगणक तयार केलाय आणि तो सुद्धा इ-कचऱ्याचा वापर करून. 

वाढत जाणाऱ्या इ-कचऱ्याचा धोका लक्षात घेऊन जयंतने इ-कचऱ्यापासून संगणक तयार करण्याचा निर्णय घेतला.

नववी नापास झाल्यानंतर जयंत निराश झाला नाही तर त्याने इ-कचऱ्यापासून संगणक तयार केला. हा संगणक तयार करायला २ हजार ५०० ते ३ हजार खर्च येतो आणि जयंत ५ हजार ५०० हजाराला तो संगणक विकतो. 

गरीब मुलांना जास्तीत जास्त  फायदा व्हावा, या उद्देशाने हा संगणक तयार केल्याचं जयंतने सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा