Advertisement

सरकारी सेवा आता एका क्लिकवर


सरकारी सेवा आता एका क्लिकवर
SHARES

मुंबई - जन्मदाखला असो वा मृत्यूचा  दाखला, रहिवासी प्रमाणपत्र असो वा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रा, अशी अनेक प्रमाणपत्रे, दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या पाय-या झिजवाव्या लागतात. कधीकधी चिरीमिरी देऊन कामे करून घ्यावी लागतात. आता मात्र यापुढे चिरीमिरी न देता, सरकारी कार्यालयांच्या फे-या न मारता घरी बसल्या एका क्लिकवर या सेवांचा लाभ नागरीकांना घेता येणार आहेत. कारण आजपासून राईट टू सर्व्हिस अॅक्ट अर्थात सेवा हमी कायदा राज्यभर लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत तब्बल 43 सरकारी सेवा एक क्लिकवर आॅनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपला कोणताही दाखला आणि प्रमाणपत्र एका ठराविक मुदतीत अर्जदारांना मिळणार अाहे. www.aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे महसूल विभाग, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री आणि प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग यांसारख्या विभागातील सेवा एका क्लिकवर आता उपलब्ध झाल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा