Advertisement

Apple चा नवा iPhone लाँच, भारतात 'इतकी' आहे किंमत

Apple कंपनीचा नवा iPhone हा सर्वात स्वस्त iPhone SEचे अपडेट व्हर्जन आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.

Apple चा नवा iPhone लाँच, भारतात 'इतकी' आहे किंमत
SHARES

अमेरिकन कंपनी Apple नं एक नवा iPhone लाँच केला आहे. विशेष म्हणजे सर्वात स्वस्त iPhone SEचे अपडेट व्हर्जन आहे. म्हणून या स्मार्टफोनला iPhone SE 2020 असं संबोधलं जात आहे. Appleनं हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिएंटमध्ये बाजारात उतरवला आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनसाठी प्री ऑर्डर्स सुरू करण्यात आली आहे.

iPhone SE 2020 सोबत कंपनीनं पुन्हा एकदा टच आयडी फीचर परत आणले आहे. छोटी स्क्रीन, वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आणि टच आयडीसारखे फीचर्स देऊन मिड रेंज सेग्मेंटमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत करण्याचा Apple चा प्रयत्न आहे.


iPhone SE 2020 चे वैशिष्ट्य?


१) डिस्प्ले

  • iPhohe SE 2020 मध्ये 4.7 इंचाचा रेटिना LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं हाच डिस्प्ले iPhone ११ मध्येही दिला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये Apple A13 Bionic प्रोसेसर आहे. iPhone 11 मध्येही हेच प्रोसेसर आहे.
  • फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. मात्र, यात फेस आयडी सपोर्ट देण्यात आलेला आहे.


२) डिझाइन

  • iPhone SE 2020 च्या बॉडीबाबत सांगायचं झाल्यास या एअरोस्पेस ग्रेड एल्यूमिनियम आणि ड्यूरेबल ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
  • फ्रंट आणि बॅक पॅनलमध्येही हेच मेटेरियल वापरण्यात आलं आहे.
  • बॅक पॅनलवर देण्यात आलेला Apple लोगो सात लेयरच्या कलर प्रोसेसनं बनवण्यात आला आहे.


३) कॅमेरा

  • iPhone SE 2020 मध्ये १२ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. याचे अपर्चर f/1.8 आहे.
  • A13 Bionic चिपसेटसोबत असलेला कॅमेरा अनेक कॉप्युटेशनल फोटॉग्राफीला अनलॉक करतो असा दावा कंपनीनं केला आहे.
  • कॅमेऱ्यात पोर्ट्रेट मोडचं ऑप्शन देण्यात आलं आहे. Appleनं यात सहा प्रकारचे पोर्टेट लायटिंग इफेक्ट्स दिले आहेत.
  • कॅमऱ्याच्या डेप्थ कंट्रोलसाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. या 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. त्यात 30fps सपोर्ट देखील देण्यात आला आहे.


४) वॉटर अॅण्ड डस्ट प्रूफ

  • स्मार्टफोनच वैशिष्ट्य म्हणजे हा वॉटर प्रूफ आहे. यात IP67 रेटिंग आहे. कंपनीने दावा केला आहे की, १ मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे ठेऊ शकतात. तसेच हा फोन डस्ट रेजिस्टेंट आहे.
  • iPhone SE 2020 वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो.
  • रेड, ब्लॅक आणि व्हाइट या तीन कलर व्हेरिएंट्समध्ये कंपनीनं हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.


५) किंमत

  • भारतीय बाजारात iPhone SE 2020ची किंमत ४२ हजार ५०० रुपये असेल.
  • हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. बेसिक व्हेरिएंटमध्ये 64GB तर अपग्रेड व्हेरिएंटमध्ये 256GB स्टोरेज देण्यात आले आले आहे.


६) ड्युअल सिम

  • कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. यात एक ई-सिम असेल. दुसरे फिजिकल सिम टाकू शकतात.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा