बेस्टची दिवाळी भेट

 Pali Hill
बेस्टची दिवाळी भेट

मुंबई - बेस्टचा प्रवास खऱ्या अर्थानं बेस्ट करण्यासाठी बेस्ट प्रशासनानं मोबाईल अॅप सुरू केलं असून या अॅपचा शुभारंभ दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजेच 27 ऑक्टोबरला होणार आहे. गुरूवारपासून मोबाईलवर तिकीट आणि पासचे नुतनीकरण करता येणार आहे. मात्र,  त्यासाठी प्रवाशांना बेस्टचा रिडलर (RIDLR) मोबाईल अॅप डाऊनलोड करणं गरजेचे आहे. सुरूवातीला केवळ वातानुकुलित बसमार्गावरच अॅपद्वारे तिकीट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वच बेस्टमार्गावर ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवाशी स्वत: अॅपवरून तिकीट काढू शकतील वा कंडक्टरकडून अॅपवरून तिकिट काढून घेता येणार आहे.

Loading Comments