Advertisement

'वनप्लस ५ टी'वर मिळतेय ही ऑफर


'वनप्लस ५ टी'वर मिळतेय ही ऑफर
SHARES

'वनप्लस ५' चं अपडेटेड व्हर्जन असलेला 'वनप्लस ५ टी' हा स्मार्टफोन मंगळवारी भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या ऑनलाईन स्टोरवर सुरू करण्यात आली आहे.


वनप्लस ५ टी ची किंमत  

६ जीबी रॅम/६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजची क्षमता असलेल्या 'वनप्लस ५ टी' या स्मार्टफोनची किंमत ३२,९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेजची क्षमता असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. हे दोन्ही मॉडेल मिडनाइट ब्लॅक या रंगात उपलब्ध आहेत. 


कोणती ऑफर मिळणार?

  • 'वनप्लस ५ टी' हा स्मार्टफोन १२ महिन्यांच्या 'अॅक्सिडेंटल डॅमेज वाॅरंटी'सह मिळणार आहे. ही वाॅरंटी मिळवण्यासाठी यूझर्सना फोन खरेदी केल्यानंतर 'कोटक ८११' हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्याद्वारे बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये १००० रुपये जमा करावे लागतील. 
  • या व्यतिरिक्त 'वनप्लस ५ टी' हा फोन अॅमेझॉन डॉट कॉमवरून एचडीएफचीच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास यूजर्सना १५०० रुपयांचं डिस्कांऊंट मिळेल. ही ऑफर २ डिसेंबरपर्यंत सुरू राहील.
  • याचसोबत १ वर्षांपर्यंत 'जोमॅटो गोल्ड मेंबरशिप', किंडल स्टोरवर ५०० रुपये क्रेडिट, नवीन अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपवर ३०० रुपयांचा कॅशबॅक आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अॅपद्वारे व्हिडिओ स्ट्रिम केल्यास २५० रुपये बॅलेंसच्या स्वरुपात मिळतील.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा