कांबळे, धमसम मनपाचे 'ऑफीसर ऑफ द मंथ'

  Pali Hill
  कांबळे, धमसम मनपाचे 'ऑफीसर ऑफ द मंथ'
  मुंबई  -  

  मुंबई - पालिकेकडून डिसेंबर-2016 साठी महिन्याचे मानकरी म्हणून विधी खात्यातील प्रशासकिय अधिकारी प्रमोद कांबळे आणि रामदास धमसम यांची निवड करण्यात आलीय. महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित महापालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकी दरम्यान पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

  सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांसह विविध न्यायालयांमध्ये महापालिकेशी संबंधित 70 हजारांपेक्षाही अधिक प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. कायदे-विषयक कारवाई वेळेत होण्यासह त्याचे संनियंत्रण सुयोग्य प्रकारे करता यावे, यासाठी महापालिकेनं 'लिटिगेशन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर' तयार केलंय. उपायुक्त (सामान्य प्रशासन) सुधीर नाईक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे प्रभारी संचालक महेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनात हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं. हे सॉफ्टवेअर विकसित होत असताना विधी खात्यातील प्रशासकीय अधिकारी प्रमोद कांबळे आणि व्यवस्थापन लिपिक रामदास धमसम यांनी अथक मेहनत घेतली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.