रस्ता चुकल्यास गुगल मॅप्स करणार अलर्ट

गुगल मॅप्सला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता गुगल मॅप्स मागील काही दिवसांपासून नवीन फीचर्स लाँच करत आहे. अशातच आता, गुगल मॅप्स 'ऑफ रूट' अलर्ट फीचर लाँच करणार आहे.

SHARE

कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी लोक सुरुवातीला गुगल मॅप्सची मदत घेतात. आपण उभं असलेलं ठिकाण आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय, ते ठिकाण टाकल्यास आपल्याला गुगल मॅप्सद्वारे रस्ता दाखवला जातो. त्यामुळं गुगल मॅप्सला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुगल मॅप्स मागील काही दिवसांपासून नवीन फीचर्स लाॅन्च करत आहे. अशातच आता, गुगल मॅप्स 'ऑफ रूट' अलर्ट फीचर लाॅन्च करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसंच, हे फीचर सध्या फक्त भारतीय युजर्ससाठी असणार आहे.

नवीन फीचर

गुगल मॅप्सचे हे नवे फीचर टॅक्सी, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षिता लक्षात घेऊन विकसित करण्यात येणार आहे. या फिचरनुसार, तुमची टॅक्सी किंवा कॅब निर्धारित केलेल्या मार्गापेक्षा ५०० मीटरपेक्षा अधिक चुकीच्या रस्त्यावरून जात असेल, तर गुगल मॅप्सकडून युजर्सला ताबडतोब अलर्ट मिळणार आहे. मुंबईतील अनेक नवीन प्रवासी, महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं हे फीचर महत्त्वाचं असणार आहे.

'ऑफ रूट' अलर्ट

सध्या गुगलने आपल्या अॅपमध्ये स्पीडोमीटर आणि लोकेशन शो सपोर्टसारखे फीचर आणले आहेत. यासाठी रूट प्रीव्ह्यू, स्पीड कॅमेरा आणि स्पीड लिमिट अलर्टला भारतीय युजर्ससाठी लाॅन्च करणार आहेत. मात्र, येत्या काळात गुगल मॅप्स 'ऑफ रूट' अलर्ट फीचर लॉंच करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेहेही वाचा -

'वायू' वादळाचं संकट: गुजरातला हायअलर्ट, मुंबईला सावधानतेचा इशारा

चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या