Advertisement

12 हजारांखालील चायनीज फोन्सवर बंदी घालण्याचा भारत सरकारचा विचार

स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचचले जात आहे.

12 हजारांखालील चायनीज फोन्सवर बंदी घालण्याचा भारत सरकारचा विचार
SHARES

भारतात चायनीज अ‌ॅपवर बंदी घातल्यानंतर चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या काही मोबाईल फोनवर बंदी घालण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत लवकरच चीनी स्मार्टफोन कंपन्यांच्या अशा फोनवर बंदी घालू शकते, ज्यांची किंमत 12 हजारापेक्षा कमी आहे. चिनी कंपन्या जगभरात कमी बजेटमधील फोन सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेत. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचचले जात आहे.

या निर्णयाचा सर्वात मोठा फटका (Xiaomi) शाओमीला बसणार आहे. कारण बजेट स्मार्टफोन विक्रीत शाओमी अग्रस्थानी असलेली कंपनी आहे. यानंतर, Itel, Tecno आणि Infinix सारखे स्वस्त फोन बनवणाऱ्या Transsion च्या मार्केटलाही या निर्णयाचा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे चिनी कंपन्यांच्या आगमनामुळे लावा (Lava) आणि मायक्रोमॅक्स (Micromax) सारख्या देशांतर्गत कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या विक्रीवर वाईट परिणाम झाला.

अ‌ॅपल आणि सॅमसंग कंपनीच्या फोनच्या किमती जास्त असल्याने त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

या अहवालाबाबत Xiaomi, Realme आणि Transsion यांना विचारण्यात आले, तरीही कंपनीकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. भारताच्या आयटी मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही ब्लूमबर्ग न्यूजच्या चौकशीला प्रतिसाद दिला नाही.

भारतातील एंट्री लेव्हल मार्केटमधून बाहेर पडल्यास, Xiaomi आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागेल. चीनमधील लॉकडाऊननंतर या कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली होती.

चीनमध्ये कोरोनामुळे फोनची मागणी जवळपास संपली होती. मार्केट-ट्रॅकिंग काउंटर पॉईंटनुसार, जून 2022 च्या तिमाहीत 12 हजारांपेक्षा कमी स्मार्टफोनचा वाटा एक तृतीयांश होता. यामध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा वाटा 80 टक्के आहे.

5 जुलै रोजी, Vivo विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने Vivo आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांच्या विविध राज्यातील 44 ठिकाणी छापे टाकले होते. छापा टाकल्यानंतरच कंपनीचे संचालक झेंग शेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले.

रॉयल्टी आणि करचुकवेगिरीच्या नावाखाली चिनी मोबाईल कंपन्यांनी देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप होता. एप्रिलमध्ये, चीनी मोबाइल कंपनी Xiaomi ची 5,551 कोटी रुपयांची मालमत्ता FEMA उल्लंघनासाठी जप्त करण्यात आली होती. कंपनीने आपली कमाई बेकायदेशीरपणे भारताबाहेर पाठवल्याचा आरोप होता.हेही वाचा

भारतात बॅटलग्राऊंड गेमवर बंदी का? या कारणाची होतेय चर्चा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा