• जियो... अब और जी भरके
SHARE

मुंबई - जियो वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता जियोची मोफत सेवा 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आलीय. रिलायन्स जियो कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी 90 दिवसांनंतर पुन्हा एकदा सर्वांसमोर येत नवीन जियो युजर्सना 31 मार्चपर्यंत व्हाइस आणि इंटरनेटची मोफत सेवा दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासह त्यांनी जियो वापरणाऱ्यांचे आभारही मानले. नुकत्याच रिलायन्सने जारी केलेल्या रिपोर्टनुसार जिओचे 50 मिलियन म्हणजेच 5 कोटी युजर्स झाले आहेत. आता तुमचा जुना नंबर पोर्टेबलही करता येणार आहे. मुकेश अंबानींनी याला नवीन वर्षाची भेट असल्याचं सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या