बेस्टचे तिकीटही मोबाईलवर

 BEST depot
बेस्टचे तिकीटही मोबाईलवर

कुलाबा- बेस्टने प्रवास करायचा म्हणजे सुट्टे पैसे खिशात ठेवावेच लागतात. त्याचवेळी गर्दीच्या वेळेस तिकीट घेणे प्रवाशाला त्रासदायक असते. आता मात्र बेस्ट प्रवाशांची या सर्व गोष्टीतून सुटका होणार आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात बेस्टचे तिकीट मोबाईलवर मिळणार आहे. उपनगरीय रेल्वेप्रमाणे बेस्टचे तिकीट मोबाईलवरून उपलब्ध करुन देण्याची घोषणा बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बेस्टच्या संकेतस्थळावरून तिकीट काढता येणार असून याबाबतची यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या बेस्टकडून सुरू आहे.

Loading Comments