PUBG नं पटकावला 'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८'

'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८' हा मान यंदा PUBG या खेळाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अॅवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे.

SHARE

ऑनलाईन जगतामध्ये सतत नवनवे खेळ येत असतात. सध्या बहुचर्चीत असलेला खेळ म्हणजे PUBG ! PUBG या खेळानं सध्या तरुणाईला चागलंच याड लावलं आहे. दिवसेंदिवस हा खेळ प्रचंड लोकप्रिय होत आहे. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो या खेळात रमलेला दिलस आहे. या खेळाची लोकप्रियता तर आता आणखी वाढणार आहे.


दोन पुरस्कार

'गुगल प्ले बेस्ट गेम ऑफ २०१८' हा मान यंदा PUBG या खेळाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अॅवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये PUBG या ऑनलाईन खेळानं 'Most Competitive Title' आणि 'Fan Favourite' हे दोन पुरस्कार पटकावले आहेत.


युझर चॉईस कॅटेगरी

यामध्ये पहिल्यांदाच 'युझर चॉईस कॅटेगरी' सुरू करण्यात आली आहे. विजेत्यांची निवड गुगल प्लेवर फॅन्स करतात. भारतामध्ये PUBG नं युझर चॉईस कॅटेगरी हा किताब पटकावला आहे. सेनसॉर टॉवर या रिसर्च फर्मनं केलेल्या सर्व्हेनुसार, PUBG ला २४०दशलक्ष डाऊनलोड्स आहेत. यावर्षी गोल्डन जॉयस्टिक अॅवॉर्डनं देखील या खेळाला गौरवण्यात आलं होतं.हेही वाचा -

PUBGचा चौथा सिझन लाँच
संबंधित विषय
ताज्या बातम्या