Advertisement

आता रिलायन्स जिओचा मोबाईल फुकट!


आता रिलायन्स जिओचा मोबाईल फुकट!
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी 4जी चा नवीन फीचर मोबाईल लाँच केला. मुंबईत झालेल्या रिलायन्स कंपनीच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी हा जिओ मोबाईल मोफत असल्याची घोषणा देखील केली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रिज शेअर्सच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेल आणि आयडिया यांच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या अॅन्युअल जनरल मीटिंग अर्थात एजीएमने रिलायन्स समूहाचे एमडी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या नव्या फीचर मोबाईलची घोषणा केली.



मोबाईलचे स्पेशल फीचर्स?

  • खास फीचर व्हॉईस कमांड
  • 2.4 इंचाचा कलर डिस्प्ले
  • 512 MB रॅम आणि 4 GB इंटर्नल मेमरी
  • मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनची मेमरी वाढू शकते
  • ब्लूटूथ, वायफाय, एनएफसी आणि जीपीएस
  • युएसबीची सुविधा
  • माय जिओ, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ म्युझिक
  • टचलाईट
  • एफएम रेडिओ


मोबाईलचे फायदे

  • 21 भाषांना सपोर्ट करणारा सर्वात स्वस्त फोन
  • 153 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटा
  • फ्री व्हॉईस कॉल
  • 54 रुपयांचा वीकली प्लॅन
  • 24 रुपयांत 2 दिवसांचा प्लॅन
  • मोफत वॉईस कॉल


मोबाईलची किंमत?

या फोनची किंमत 1000 ते 1500 पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला डिपॉझिट म्हणून तुम्हाला 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण हा फोन 3 वर्ष वापरल्यानंतर परत दिल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. त्यामुळे एका अर्थी मोबाईल फुकटच म्हणावा लागेल!


रिलायन्स जिओच्या ट्विटर अकाऊंटवर मुकेश अंबानी यांचं एजीएममधलं भाषण लाइव्ह दाखवण्यात आलं..





हेही वाचा -

जियो... अब और जी भरके


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा