Advertisement

Jio ने आणलं JioMeet, १०० जण होऊ शकतात मिटिंगमध्ये सहभागी

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) नेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप आणलं आहे.

Jio ने आणलं JioMeet, १०० जण होऊ शकतात मिटिंगमध्ये सहभागी
SHARES

आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) नेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप आणलं आहे. जिओने एचडी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप JioMeet लाँच केलं आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने सध्या घरूनच काम करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच नातेवाईक, मित्र यांना भेटणं बंद झालं आहे. त्यामुळे आपल्या प्रियजनांशी बोलण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी किंवा वर्क फ्रॉम होम करताना ऑफिस मिटिंगसाठी व्हिडीओ कॉलचा वापर JioMeet मध्ये सहजपणे करता येणार आहे.


सेवा नि:शुल्क असलेले JioMeet  गूगल प्ले स्टोअरवरून  डाउनलोड करता येणार आहे.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये  तब्बल १०० जणांना सहभागी होता येणार आहे. स्क्रिन शेअर करणं, मिटिंग शेड्युल करणं अशा अनेक गोष्टी JioMeet वरून सहज करता येणार आहेत. डेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात.


आयटी आणि इतर कंपन्यांमधले कर्मचारी सध्या घरूनच काम करत आहेत. त्यामुळे एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी अशा माध्यमांचा उपयोग केला जातो. त्या सगळ्यांसाठी आता JioMeet ने  एक अतिशय दर्जेदार पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरू करणार असल्याची घोषणा ३० एप्रिलला केली होती. 


लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे JioMeet हा अजून एक पर्याय युजर्सकडे आला असून याद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लोकप्रिय असलेल्या झूम अ‍ॅपला थेट टक्कर मिळेल.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा