Advertisement

सॅमसंगच्या स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीत ऑगस्‍टमध्‍ये मोठी वाढ

स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स व रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करणाऱ्या सॅमसंगने ऑगस्‍ट महिन्‍यामध्‍ये विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे.

सॅमसंगच्या स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीत ऑगस्‍टमध्‍ये मोठी वाढ
SHARES

स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स व रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करणाऱ्या सॅमसंगने ऑगस्‍ट महिन्‍यामध्‍ये विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. ऑगस्‍टमध्ये सॅमसंगच्या ५५ इंची आकाराच्‍या स्‍मार्ट टीव्‍हींच्या विक्रीत ९ टक्‍क्‍यांची  तर ८ किलोग्रॅमपेक्षा अधिक क्षमता असलेल्‍या वॉशिंग मशिन्‍सच्या विक्रीत ५२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

सॅमसंग महाराष्‍ट्रातील टीव्‍ही बाजारपेठत अग्रणी कंपनी बनली आहे. महाराष्‍ट्रातील टीव्‍ही बाजारपेठेत सॅमसंगचा २६.८ टक्‍के हिस्सा आहे. अलिकडील काळात सॅमसंग हायजिन स्टिम सारख्‍या उच्‍च क्षमतेच्‍यापूर्णत: ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍सच्‍या मागणीमध्‍ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्‍ट्रातील मोठ्या शहरांसोबत द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये, तसंच ग्रामीण भागांमध्‍ये सॅमसंगच्या वॉशिंग मशिन्‍सची मागणी वाढली आहे. डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटर्स असलेल्या सॅमसंग वॉशिंग मशिन्‍स वापरादरम्‍यान कमी ऊर्जेचा वापर करतात. तसेच वॉशिंग मशिन सुरू असताना आवाज व स्‍पंदन देखील कमी होतात. कमी घर्षणामुळे वापरादरम्‍यान वॉशिंग मशिन शांत व सुलभ कार्यसंचालनाची खात्री देते.

लोक घराबाहेर पडण्‍याचे प्रमाण कमी झाल्याने आणि घरीच अधिक खाद्यपदार्थ साठवून ठेवत असल्‍यामुळे मोठ्या क्षमतेच्‍या सॅमसंग रेफ्रिजरेटर्सच्याही मागणीमध्‍ये वाढ झाली आहे. या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी सॅमसंगने नुकताच उच्‍च क्षमता असलेला जगातील पहिला रेफ्रिजरेटर कर्ड माएस्‍ट्रो सादर केला. हा रेफ्रिजरेटर ३८६ लिटर व ४०७ लिटर मॉडेल्‍समध्‍ये सादर करण्‍यात आला आहे. कर्ड माएस्‍ट्रो सर्वात महत्त्वाचे काम म्‍हणजे किण्‍वन प्रक्रियेचे काम करतो. ते दहीचे किण्‍वन करण्‍यासह स्‍टोअर देखील करेल. कर्ड माएस्‍ट्रो प्रत्‍येकवेळी त्‍याच प्रक्रियेने दही बनवतो. कर्ड माएस्‍ट्र ६.५ ते ७.५ तासांमध्‍ये दही तयार करतोय पातळ दहीसाठी ६.५ तास आणि घट्ट दहीसाठी ७.५ तास वेळ लागतो.

सॅमसंगने आयओटी सक्षम स्‍पेसमॅक्‍स फॅमिली हब रेफ्रिजरेटर देखील सादर केला आहे. सॅमसंगने रेफ्रिजरेटरची ३२.८ टक्‍के बाजारपेठ काबीज केली आहे.  सॅमसंग रेफ्रिजरेटर विभागामध्‍ये बाजारपेठ अग्रणी कंपनी बनली आहे.

सॅमसंगने खास भारतासाठी बनवण्‍यात आलेल्‍या मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍समध्‍ये नाविन्‍यता आणत भारतीय कूकिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल आणला आहे. ग्राहक आता नवीन मायक्रोवेव्‍ह रेंजमध्‍ये रोटी/नान व दही, मसाला, तडका आणि सन-ड्राय फूड तयार करू शकतात.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा