सनमिल गल्ली होणार कॅशलेस

 Lower Parel
सनमिल गल्ली होणार कॅशलेस

लोअर परळ - अजूनही चलनपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. अनेक एटीएममध्ये सुट्टे आणि पुरेसे पैसे मिळत नाहीयेत. या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी लोअर परळच्या सनमिल गल्लीतील लहान-लहान दुकानदार सरसावले आहेत. त्यांनी पेटीएमद्वारे व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुट्टे पैसे नसल्यामुळे ग्राहक तसाच परत जाण्याचा प्रकार कमी झालाय. भाई पाटील या सॅन्डविच स्टॉलधारकानं पेटीएम व्यवहार सुरू केला. त्याचं अनुकरण करत इतरांनीही पेटीएम सेवा सुरू केलीय.या सेवेला ग्राहकांकडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतोय. यामुळे सुट्टे पैसे देण्या-घेण्याच्या कटकटीतून सुटका झाल्याचं भाई पाटील यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं.

Loading Comments