अंधेरीत बाल वैज्ञानिकांसाठी अनोखं विज्ञान प्रदर्शन

 Andheri
अंधेरीत बाल वैज्ञानिकांसाठी अनोखं विज्ञान प्रदर्शन
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - चिमुकल्यांसाठी अंधेरीतल्या भवन्स कॉलेज शेजारी असलेल्या बाई कबीबाई बालवाटिका विद्यालयाच्या वतीने शनिवारी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.

यामध्ये 2 ते 5 गटातील 700 बाल वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गती, हवेचा दाब, पाण्याचे गुणधर्म असे एक ना अनेक प्रयोग या बाल वैज्ञानिकांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरता शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता चव्हाण आणि शाळेच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. हे प्रदर्शन बघण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती.

तर यामाध्यमातून मुलांना विविध वैज्ञानिक गोष्टी शिकता याव्यात यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे बाई कबीबाई शाळेच्या मुख्यध्यापिका वनिता चव्हाण यांनी सांगितलं.

Loading Comments