चेंबूर रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सुविधा

 Chembur
चेंबूर रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सुविधा

चेंबूर - गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यानुसार चेंबूर रेल्वे स्थानकात देखील 5 नोव्हेंबरला मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. मात्र ही सुविधा रेल्वेकडून नव्हे तर शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. शिवसेना शाखा क्रंमाक 152च्या वतीने ही वायफाय सुविधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्याचं उद् घाटन शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी याठिकाणी अनेक शिवसैनिकांनीही हजेरी लावली होती.

Loading Comments