Advertisement

टेकफेस्टमध्ये येणार सोफिया!

दरवर्षी होणाऱ्या मुंबईच्या आयआयटी टेकफेस्टमध्ये सोफिया सहभागी होणार आहे. आणि नुसतीच सहभागी नाही, तर ती आयआयटीमधल्या टेक्नोसॅव्ही विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहे.

टेकफेस्टमध्ये येणार सोफिया!
SHARES

सामान्य मानवाप्रमाणेच तिचा चेहरा, तिचे हात-पाय, तिचे हावभाव इतकंच काय, तिचं बोलणं, तिचं चालणं हे सगळं अगदी एखाद्या सामान्य माणसासारखं! पण ती एक रोबोट आहे! आपण जेव्हा तिच्याशी बोलू, तेव्हा ती रोबोट असण्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही इतकी ती 'मानवी' आहे! तिचं नाव आहे सोफिया!


सौदी अरेबियाची नागरिक सोफिया

सोफियाबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण त्याहून मोठं आश्चर्य तेव्हा वाटलं, तेव्हा या रोबोट असलेल्या सोफियाने आखाती देशातील एक देश सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलं. अशा प्रकारे एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश आहे.


आयआयटी टेकफेस्टमध्ये घेणार सहभाग

आणि आता जगातलं हे आश्चर्य आणि सौदी अरेबियाची नागरिक असलेली सोफिया भारतात येत आहे. तेही मुंबईत! दरवर्षी होणाऱ्या मुंबईच्या आयआयटी टेकफेस्टमध्ये सोफिया सहभागी होणार आहे. आणि नुसतीच सहभागी नाही, तर ती आयआयटीमधल्या टेक्नोसॅव्ही विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहे.




टेकफेस्ट...रोबोंचा महामेळा!

टेकफेस्ट'मध्ये दरवर्षी नवनव्या रोबोंचं सादरीकरण होतं. तज्ज्ञांची चर्चसत्रं होतात. यंदा प्रथमच चर्चासत्रात चक्क रोबो सहभागी होणार आहे. मानवी भावना व्यक्त करणारी 'सोफिया' हा विज्ञानाचा अनोखा आविष्कार मानला जातो. आयआयटीच्या 'टेकफेस्ट'मध्ये सोफियाला निमंत्रित करण्यात आले आहे. सोफियाला बनवणाऱ्या कंपनीने याला होकार दिला आहे. आयआयटी अनेक महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा करत होती.


कोण आहे सोफिया?

सोफिया एक रोबोट आहे. विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली अत्याधुनिक यंत्रमानव! सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखू शकते आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलू शकते. अनेक मीडिया चॅनल्सला तिने मुलाखतीही दिल्या आहेत. ‘हॅन्सन रोबोट‌िक्स’ने सोफियाची ‌निर्मिती केली असून कंपनीचे संस्थापक असलेल्या डेव्हिड हॅन्सन यांनी तिची रचना केली आहे.



हेही वाचा

टेकफेस्टची धूम २९ डिसेंबरपासून


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा