ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोफेस्ट 2017

 Kandiwali
ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोफेस्ट 2017

कांदीवली - ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये टेक्नोफेस्ट 2017 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या फेस्टचे आयोजन आधुनिक पद्धतीने करण्यात आले होते. या फेस्टमध्ये मुलांनी शेतीविषयक प्रोजेक्ट सादर केले. यामध्ये पिकांवर मारण्यात येणाऱ्या किटकनाशकाचा कसा वापर करता येऊ शकतं याचेही सादरीकरण करण्यात आले होते. तसेच अशुद्ध पाणी स्वच्छ करण्याचे मशिन देखील या फेस्टमध्ये सादर करण्यात आले होते. 

या सोबत गवत कापण्याचे मशिन्सही मुलांनी तयार केले होते. यामध्ये सौरउर्जेवर चालणारे मशिनही मुलांनी तयार केले होते. विशेष म्हणजे ठाकूर कॉलेजच्या मुलांनी ऑल इन वन कार्ड नावाचे मशिन तयार केले आहे. ज्यामध्ये पासपोर्ट बनवने,आधारकार्ड बनवणे,वोटींग कार्ड बनवने सोपे होणार आहे. 

Loading Comments