Advertisement

टेलिग्राम ठरले सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप

टेलिग्राम जानेवारी २०२१ मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप ठरले आहे.

टेलिग्राम ठरले सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप
SHARES

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणांमुळे अनेकांनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करुन टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा व्हॉट्सअॅपला जोरदार फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद करून सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर युजर्स शिफ्ट होत आहेत. या महिन्यात नव्यानं अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर टेलिग्राम आणि सिग्नल या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. या दोन्ही अ‍ॅप्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टेलिग्राम जानेवारी २०२१ मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप ठरले आहे. जगभरातील टेलिग्रामच्या एकूण डाऊनलोड्सपैकी २४ टक्के डाऊनलोड्स हे भारतातून झाले आहेत. याबाबतचा खुलासा सेंसर टॉवरच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जगभरात गेल्या महिन्यात (जानेवारी) ६३ मिलियन्स (६.३ कोटी) वेळा टेलिग्राम डाऊनलोड करण्यात आलं आहे. यापैकी १५ मिलियन्स (१.५ कोटी) डाऊनलोड्स एकट्या भारतात झाले आहेत.

टीक-टॉकनं सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या नॉन गेमिंग अ‍ॅप्सच्या यादीत दुसरे स्थान पटकावलं आहे. भारतात टीक-टॉक बॅन आहे. पण जगभरात या अ‍ॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. टिकटॉकनंतर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅप्सचा अनुक्रमे तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक लागतो.

टेलिग्राम अॅपचे फिचर्स

  • तुम्हाला टेलिग्रामवर व्हॉट्सअॅप प्रमाणे चॅटिंग, ग्रुप चॅट आणि चॅनेलसारखे महत्त्वाचे फिचर्स दिले जातात.
  • टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये, चॅनेल्समध्ये २ लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. ही मर्यादा व्हॉट्सअॅपमध्ये २५६ एवढी आहे.
  • टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये तुम्ही बॉट, पोल, क्विज, हॅशटॅगसह अनेक इंस्ट्रूमेंट्सचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचे चॅटिंग अधिकच इंटरेस्टिंग होईल.
  • टेलिग्राम तुम्हाला Self Destructing Messages ची सुविधा देते.
  • तुम्ही टेलिग्रामवर १.५ जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता.
  • अँड्रॉईड (Android) आणि आयओएस डिव्हाईसवर (iOS devices) व्हाईस आणि व्हिडीओ कॉल (video call) हे दोन्ही फिचर्स आहेत.
  • टेलिग्राममध्ये एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे. या अॅपमध्ये तुम्हाला सिक्रेट चॅटचा पर्यायही देण्यात आला आहे. यापैकी कोणतेही फिचर व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेले नाही.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा