घाटकोपर - नोटंबदीच्या निर्णयानंतर अनेक भाजी विक्रेते देखील डिजिटल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगवाला लेनमधील प्रदिप वर्मा यांच्या भाजी विक्रीच्या स्टॉलवर पेटीएमची सुविधा ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. प्रदिप वर्मा यांच्या या सुविधेमुळे 40 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंतची खरेदी ग्राहक करु शकतात.