Advertisement

एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन


एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
SHARES

दादर - महागाई भत्यातील फरक मूळ वेतनात समाविष्ट करून देण्यात यावा, या मागणीसाठी एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दादर पश्चिम येथील एमटीएनएल कार्यालयात आंदोलन केले.
एमटीएनएल आणि बीएसएनएल या दूरसंचार विभागाच्या दोन कंपन्या आहेत. त्यातील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना 2013 मध्येच वेतन आयोगातील 68.8 च्या ऐवजी 78.2 इतका महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून दिला. परंतु, एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना मात्र सदर महागाई भत्ता अद्यापही देण्यात आलेला नाही. म्हणजेच 9.4 इतका महागाई भत्यातील फरक एमटीएनएल कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात समाविष्ट करून देण्यात यावा, ही एमटीएनएल कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
 एमटीएनएल कामगार संघाचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. "सरकारने जीओ या कंपनीला प्रोत्साहन दिल्याने एमटीएनएल सारख्या कंपनीचे खच्चीकरण होणार असून कामगार बेरोजगार होण्याची शक्यता बळावली आहे", अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली.
यावेळी सरचिटणीस दिलीप जाधव, कार्यध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, स्थानिक लोकाधिकार समिती सरचिटणीस बाळा साटम, खजिनदार मारुती साळुंखे, स्मिता जोशी, मार्गदर्शक अण्णा पारकर त्याचबरोबर निगमच्या सर्व द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या अधिकारी आणि कर्मचाऱी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा