व्हॉट्स अॅपचे नवे फिचर

 Mumbai
व्हॉट्स अॅपचे नवे फिचर

'व्हॉट्स अॅप' हे काही क्षणात मेसेज पोचविणारे लोकप्रिय मेसेंजर अॅप आहे. व्हॉट्स अॅपवर एखाद्या वेळी चुकून पाठविलेल्या मेसेजमुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे अनेकदा माफी देखील मागावी लागते. व्हॉट्स अॅपच्या नव्या फिचरमुळे वाद आणि माफी मागावी लागणार नाही. या फिचरमध्ये चुकून पाठविलेला मेसेज डिलीट करू शकतो किंवा त्यात तात्काळ बदल देखील करू शकतो.

व्हॉट्स अॅप वर एखादा मेसेज पाठवल्यानंतर पुढील पाच मिनिटांत तुम्हाला तो मेसेज एडिट किंवा डिलीट करण्याचा कालावधी असणार आहे. व्हॉट्स अॅप या नव्या फिचरसाठी गेल्या अनेक महिन्यापासून रिव्होक (Revoke) या फिचरवर काम करत आहे. व्हॉट्स अॅपच्या या नव्या फिचरची माहिती @WABetalnfo टि्वटरवरील पेजवरून देण्यात आली आहे. या टि्वटरमध्ये रिव्होक फिचर दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एक स्क्रिन शॉट लिक केले आहे. ज्यामध्ये अँड्रॉईड बीटा यूजर्स व्हर्जन 2.17.148 वर फॉन्ट शॉटकट असणार असल्याचे म्हटले आहे.

Loading Comments