व्हॉट्सअॅप स्टेटस इज बॅक!

  Mumbai
  व्हॉट्सअॅप स्टेटस इज बॅक!
  मुंबई  -  

  मुंबई - व्हॉट्स अॅपने पुन्हा एकदा जुने स्टेटस फिचर सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी स्टेटस म्हणून टेक्स्ट मेसेज टाकण्याची सुविधा बंद करत स्टेटस म्हणून फोटो अपलोड करण्याची नवीन सुविधा व्हॉट्सअॅपने सुरु केली होती. मात्र या बदलामुळे व्हॉट्स अॅप युजर्सनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे युजर्सची वाढती नाराजी लक्षात घेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे जुने स्टेटस पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

  जुने स्टेटस फिचर कसे सुरू कराल?

  या स्टेटस फिचरला 'About' असे नाव देण्यात आले आहे. जुने स्टेटस सुरू करण्यासाठी यूजर्सला सेटिंगमध्ये जाऊन बदल करावे लागतील. तुमच्या प्रोफाइल फोटोच्या खाली तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल. तसेच तुम्हला आवडेल ते स्टेटस तुम्ही ठेवू शकता किंवा एडिट देखील करू शकता. यासह पूर्वी दिलेले स्टेटसचे पर्यायसुद्धा तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस देखील सुरू ठेऊ शकता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.