Advertisement

व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर तुम्हाला माहीत आहे का?


व्हॉट्सअॅपचं हे नवीन फीचर तुम्हाला माहीत आहे का?
SHARES

तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअॅपवर चुकून एखादा मेसेज पाठवला असाल आणि तो तुम्हाला तातडीने डिलीट करायचा असेल, तर आता ते शक्य होणार आहे. कारण, व्हॉट्सअॅपने 'डिलीट फॉर एव्हरीवन' हे नवीन फिचर लॉन्च केलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या या फीचरचं टेस्टिंग सुरू होतं. व्हॉट्सअॅपचं हे फीचर अॅन्ड्रॉईड, आयओएस, विंडोज या मोबाईल यूजर्ससाठी सुरू करण्यात आलं आहे.


या फीचरचे काय आहेत फायदे?

यापूर्वी व्हॉट्सअॅपवरून जर एखाद्याला चुकून मेसेज गेला, तर तो डिलीट करता येत नव्हता. आता समोरच्या व्यक्तीला मेसेज गेल्यानंतर तो सात मिनिटांच्या आत डिलीट करता येणार आहे. पण समोरच्या व्यक्तीने तो मेसेज वाचलेला नसावा. या फीचरमुळे फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर फोटो, व्हिडिओ, जीआयएफ, कॉन्टॅक्ट कार्ड या गोष्टी ताबडतोब डीलीट करता येणार आहेत.


वैयक्तिक चॅटिंग करतानाही होणार फायदा

'डीलीट फॉर एव्हरीवन' या फीचरचा फायदा ग्रुपसोबतच वैयक्तिक चॅटिंग करतानाही होणार आहे. जे मेसेज वाचले किंवा बघितले गेले नसतील तेच मेसेज डिलीट करता येणार आहेत.

मात्र अद्यापही काही ठिकाणी ही सेवा संथ गतीने सुरु आहे. ती नियमित होण्यासाठी थोडा वेळ लागेल असं बोललं जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी लगेचच ही सुविधा वापरता येणार नाही.

व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जाणाऱ्या मेसेजला एडिट करण्यावरही काम सुरू आहे. व्हॉट्सअॅप हे जगातलं सर्वात मोठं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटस्अॅपवरून रोज जवळपास 1 कोटी लोक संवाद साधतात.



हेही वाचा

व्हॉट्सअॅपवर खोटं बोलाल तर...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा