Advertisement

व्हॉट्सअॅपवर खोटं बोलाल तर...


व्हॉट्सअॅपवर खोटं बोलाल तर...
SHARES

मी डॉक्टरकडे जात आहे...आज ऑफिसला येऊ शकणार नाही कारण मला हॉस्पिटलला जायचे आहे...असे व्हॉट्सअॅपवर सांगून गंडवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचे सगळे गुपीत बाहेर पडणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने नवे फिचर आणले आहे. यामुळे आता तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवरून एकमेकांचे लाइव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपवरून जर तुमच्याशी कोणी खोट बोलत असेल, किंवा तुम्ही कुठे संकटात असाल तर या फिचरद्वारे तुमचे लाइव्ह लोकशन समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता. याच सोबत समोरच्या व्यक्तीचे खोटे उघडे पाडू शकता. व्हॉट्सअॅपने लाइव्ह लोकेशन शेअरिंग हे फिचर व्हॉट्सअॅपवर अॅड केले आहे.

या फिचरमुळे तुम्ही असाल त्या ठिकाणचे लोकशन समोरच्या व्यक्तीला कळेल. तसेच तुमचे लाइव्ह लोकेशन समोरच्या व्यक्तीला किंवा तुमच्या ग्रुपमध्ये पाठवू शकता. हे लोकेशन तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने पुन्हा शेअर करावे लागेल. कारण हे फिचर काही ठराविक काळापार्यंतच कार्यरत असेल.


लोकशन कसे शेअर कराल

  • सर्वात आधी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जा
  • Attach या ऑप्शनवर क्लिक करा
  • लोकेशनचा पर्याय दिसल्यास तो निवडा
  • त्यानंतर तुम्हाला लोकेशन अॅड करण्यासाठी काही कालावधी विचारली जाईल
  • 15 मिनिटे, 1 तास असे पर्याय दिसतील
  • तुम्हाला तुमच्या सोईनुसार पर्याय निवडता येईल

हेही वाचा - 

आता अभ्यास करा व्हॉट्स अॅपवर!

व्हॉट्सअॅप स्टेटस इज बॅक!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा