Advertisement

You Tubeची प्रेक्षकांसाठी फ्री ट्रिट, पाहा हे '१२' शो विनामुल्य

लॉकडाऊनमुळे आता युट्यूबने देखील आपल्या युजर्ससाठी प्रिमियम कंटेट मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

You Tubeची प्रेक्षकांसाठी फ्री ट्रिट, पाहा हे '१२' शो विनामुल्य
SHARES

कोरोनाव्हायरचा प्रसार वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असल्याने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोशल मीडियापासून ते स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा आनंद युजर्स घेत आहे. लॉकडाऊनमुळे आता युट्यूबने देखील आपल्या युजर्ससाठी प्रिमियम कंटेट मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

आता युजर्स युट्यूबचे इस्केप द नाईट (Escape the Night) आणि मॅटपॅट्स गेम लॅब (Matpat’s Game Lab) सारखे लोकप्रिय शो मोफत पाहू शकतील. केवळ YouTube प्रीमियम सदस्यता असलेल्यांसाठी हे शो उपलब्ध आहेत. हे शो यूट्यूबच्या प्रीमियम सबस्क्रिप्शनचा एक भाग आहेत. ज्याची किंमत भारतात दरमहा १२९ रुपये इतकी आहे.

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील लोक घरात अडकले आहेत. आता प्रेक्षकांना मनोरंजनासाठी आणखी काही पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यात यु ट्यूबचा देखील समावेश आहे. युट्यूबवरील प्रिमियम कंटेंट पाहण्यासाठी युजर्सला महिन्याला १२९ रुपये भरावे लागत असे. मात्र आता काही प्रसिद्ध शो कुठलेच पैसे न भरता पाहता येणार आहेत.

खाली देलेले शो तुम्हाला मोफत पाहता येणार आहेत.

  • इस्केप द नाईट (Escape the Night)
  • मॅटपॅट्स गेम लॅब (Matpat's Game Lab)
  • स्टेप अप – हाय वॉटर (Step Up: High Water)
  • इमप्लस (Impulse)
  • शेरवूड (Sherwood)
  • साईट्सविप्ड (Sideswiped)
  • द साईडमन शो (The Sidemen Show)
  • फोरसम (Foursome)
  • मी अँड माय ग्रँडमा (Me and My Grandma)
  • एफ2 फायंडिंग फुटबॉल (F2 Finding Football)
  • द फेक शो (The Fake Show)
  • ओव्हरथिंकिंग विथ कॅट जून (Overthinking with Kat & June)

युट्यूब आशयाचे प्रमुख सुझान डॅनिएल्स यांनी सांगितलं की, “प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करून आम्ही हे शो मोफत पाहण्याची संधी दिली आहे. जेणे करून प्रेक्षक घरातच सुरक्षित राहतील. त्यांचं चांगलं मनोरंजन होईल.”

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमनं देखील लहान मुलांसाठी ५० पेक्षा अधिक टिव्ही शो, चित्रपट आणि नर्सरी राइम मोफत उपलब्ध केले आहेत.आता यामध्ये यु ट्यूबचा देखील समावेश झाला आहे.




हेही वाचा

Coronavirus : आता अ‍ॅलेक्सा देणार COVID 19 ची बातमी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा