Advertisement

मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात! 3 वर्षांत 30 कोटी मुंबईकरांचा प्रवास


मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात! 3 वर्षांत 30 कोटी मुंबईकरांचा प्रवास
SHARES

लोकलची गर्दी, धक्काबुक्की, घामाघूम करणारा प्रवास यातून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोने मुंबईकरांची सुटका केली. गारेगार प्रवासाचा अानंद घेत हजारो मुंबईकर दररोज मेट्रोने प्रवास करणे पसंत करतात. त्यातूनच दिवसेंदिवस मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून गेल्या तीन वर्षांत 30 कोटी प्रवाशांनी मेट्रोसफर केल्याची माहिती 'मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड'ने दिली आहे.


गारेगार प्रवासाला प्राधान्य

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोचा पहिला मार्ग जुलै 2014 मध्ये सुरू झाला. पहिल्या दिवसापासून मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरली. त्याचे मुख्य कारण म्हणजे गारेगार आणि गर्दीविरहीत प्रवास.


तिकीटदरही परवडणारे

सद्यस्थितीत तरी मेट्रोचे तिकीट दर मुंबईकरांना परवडणारे असून प्रवासही जलद होत आहे. त्यामुळेच वर्सोवा ते घाटकोपरदरम्यानच्या प्रवासासाठी मुंबईकर मेट्रोलाच प्राधान्य देताना दिसतात.


असा केला टप्पा पार

मेट्रो सेवेत दाखल झाल्यापासून 398 दिवसांत मेट्रोने 10 कोटी प्रवाशांचा आकडा पार केला. पुढील 10 कोटी प्रवाशांचा आकडा 388 दिवसांत आणि आता 337 दिवसांत 10 कोटी प्रवाशांचा आकडा मेट्रोने पार केला आहे. केवळ तीन वर्षांत 30 कोटी प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे.


28 जूनला सर्वाधिक प्रवासी

याआधी 21 सप्टेंबर 2016 रोजी सर्वाधिक 3 लाख 67 हजार प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला होता. त्यानंतर 28 जूनला एका दिवसात 3 लाख 67 हजार प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. तर 28 जून 2017 रोजी 3 लाख 71 हजार प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला आहे.



हेही वाचा

मुंबई मेट्रोने कोचीकडून शिकावं


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा