दुपारच्या वेळेत करा गारेगार प्रवास !

  Mumbai
  दुपारच्या वेळेत करा गारेगार प्रवास !
  मुंबई  -  

  वातानुकूलित (एसी) लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ही एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर सप्टेंबरपासून दुपारच्या वेळेत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कमी गर्दीच्या वेळेत ही लोकल चालवण्यात येईल. लोकलने प्रावस करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद आणि अन्य तांत्रिक अडचणींचा अंदाज घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यानंतर या सेवा ऐन गर्दीच्या वेळेत चालवण्याचे नियोजन असल्याची महिती पश्चिम रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे.

  हे देखील वाचा 

  - मुंबईकरांनो! कशी थांबवाल लोकलमधली स्टंटबाजी?

  मुंबईत एसी लोकल पहिल्यांदाच चालवली जाणार असल्याने त्याला प्रवाशांकडून किती आणि कसा प्रतिसाद मिळेल याविषयीही कुतूहल आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलची सेवा सुरू झाल्यानंतर त्यात नेमक्या कोणत्या अडचणी येतील, हा प्रमुख मुद्दा आता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होणार असून दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ऐन गर्दीच्या वेळेत ही लोकल चालवणे योग्य ठरणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  हे देखील वाचा 

  संतप्त प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये फेकली मिरचीपूड

  प्रवाशांच्या सेवेसाठी ही लोकल सुरुवातीला विरार ते चर्चगेट मार्गावर चालवण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी ही सेवा बोरिवली ते चर्चगेटपर्यंत चालवण्याचे रेल्वेचे नियोजन होते. ही लोकल चालवताना त्यात गोंधळ उडू नये यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकांवर बाउन्सर नेमण्यावरही विचार केला जात आहे. तसेच, फुकट्या प्रवाशांचा त्रास वाचवण्यासाठी लोकलमध्ये टीसींची पथके देखील नेमली जणार आहेत.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.