Advertisement

आजपासून मध्य रेल्वेवर AC लोकल सुरू

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू केली आहे.

आजपासून मध्य रेल्वेवर AC लोकल सुरू
SHARES

गेल्या ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे (Mumbai Local) दार बंदच आहे. पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल (Ac Local) सुरू केली आहे.

कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकादरम्यान १० एसी लोकल चालवण्यात येणार आहे. आज सकाळी कुर्ला स्थानकावरून पहिली एसी लोकल पहाटे सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे पहाटे ५.४२ वाजता पहिली लोकल रवाना झाली आहे.

सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकल सेवा ही सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. एसी लोकल ही धीम्या मार्गानं धावणार आहे, त्यामुळे ती सर्वच स्थानकावर थांबणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे परवानगी असेल असा प्रवाशांना एसी लोकलनं प्रवास करता येणार आहे.

जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे लोकल रेल्वेचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरतो. हा प्रवास थोडासा सुखद व्हावा यासाठी आता AC लोकल्स सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर अशा लोकल्स आधीच सुरू झाल्या आहेत. आता मध्य रेल्वेनं देखील AC लोकल सुरू केल्या आहेत.



हेही वाचा

ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश

मोदी सरकार IRCTC मधील २० टक्के हिस्सा विकणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा