Advertisement

फास्ट ट्रॅकवर आता सगळ्या लोकल १५ डब्ब्यांच्या!


फास्ट ट्रॅकवर आता सगळ्या लोकल १५ डब्ब्यांच्या!
SHARES

मध्य रेल्वेवर फास्ट्र ट्रॅकवरच्या सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आसनगाव आणि बदलापूरकडे जाणाऱ्या सर्व लोकल आता लवकरच १५ डब्ब्यांच्या होतील. यासाठी सर्व फास्ट ट्रॅकवरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त डब्ब्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ९०० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मुंबई रेल्वे विकास प्राधकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.


सध्या फक्त कल्याणपर्यंतच सेवा

सध्या मध्य रेल्वेवर १५ डब्ब्यांच्या लोकलच्या एकूण १६ फेऱ्या होतात. मात्र या सर्व फेऱ्या सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यानच होत्या. २०१२च्या ऑक्टोबर महिन्यात १५ डब्ब्यांच्या या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. कल्याण स्थानकापर्यंत सर्व प्लॅटफॉर्मची लांबी १५ डब्ब्यांसाठी पुरेशी आहे. मात्र, कल्याणपुढे ही लांबी कमी आहे. या प्लॅटफॉर्म्सची लांबी टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे.


पहिल्या टप्प्यात बदलापूरपर्यंत काम

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये बदलापूरपर्यंत प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम करण्यात येईल. तर पुढच्या टप्प्यामध्ये आसनगावपर्यंतचं काम पूर्ण करण्यात येईल.



हेही वाचा

पावसाळा पूर्व तयारीसाठी मध्य रेल्वेवर ड्रोनचा वापर!

लोकल किती वेळात येणार? हेही दिसणार, दिशा अॅपचं नवं फीचर!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा