Advertisement

मध्ये रेल्वे 'या' स्थानकांवर उभारणार फूड वेंडिंग मशीन

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं की, ही फुड वेंडिंग मशीन्स डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होतील.

मध्ये रेल्वे 'या' स्थानकांवर उभारणार फूड वेंडिंग मशीन
SHARES

मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे की, लवकरच त्याच्या उपनगरीय रेल्वे स्थानकात फूड वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनुसार, चिंचपोकळी, सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), क्रेरी रोड, घाटकोपर, कल्याण, कुर्ला, मुलुंड, परळ, ठाणे आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांवर एकूण १९ फूड वेंडिंग मशीन बसवणत येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं की, ही फुड वेंडिंग मशीन्स डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होतील. यामध्ये स्नॅक्स, चॉकलेट, ज्यूस, पाणी आणि इतर उपभोग्य वस्तू असतील. निकट भविष्यकाळात खाजगी स्टॉल्स बंद राहण्याची अपेक्षा असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक रॉबिन कालिया म्हणाले की, “सर्व प्रमुख स्थानकांवर फूड वेंडिंग मशीन उपलब्ध असतील. ज्या स्टेशन्स आणि प्लॅटफॉर्मवर फूड स्टॉलसाठी जागा कमी आहे तिथं वेंडिंग मशीन सहज उपलब्ध होऊ शकतात. ”

“रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतरही फूड स्टॉल्स बंद राहण्याची शक्यता आहे. कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. उपनगरीय प्रवाश्यांसाठी फूड वेंडिंग मशीन उपयुक्त ठरणार आहेत, ”मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

त्यानंतरच्या काळात शहरातील अधिक स्थानकांवर फूड वेंडिंग मशीन आणण्याचा रेल्वे मंडळाचा विचार आहे. स्वतंत्रपणे मध्ये रेल्वेनं हेल्थ-बेस्ड वेंडिंग मशीन देखील आणली आहेत. ज्यात फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि हँड ग्लोव्हज या वस्तू उपलब्ध होतील.

या मशीनच्या मदतीनं लोक ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, बॉडी मास इंडेक्स (BMI), ऑक्सिजन पातळी, वजन तसंच शरीरातील हायड्रेशन पातळी तपासू शकतात. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये अशा प्रकारचे मशीन्स पाहायला मिळत आहेत.हेही वाचा

बनावट आयडीचा वापर करून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वे करणार कारवाई

Mumbai Local: मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय