Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

ठाणे स्थानकावरील भार लवकरच 'हलका', विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

तब्बल २० वर्षांपासून रखडलेल्या ठाणे रेल्वे स्थानक विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्तारीकरणात मोठा अडथळा बनलेल्या जागेचा प्रश्न राज्य सरकारनं निकाली काढला आहे. त्यामुळे लवकरच ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन कोपरी स्थानक तयार होणार आहे.

ठाणे स्थानकावरील भार लवकरच 'हलका', विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा
SHARES

ठाणे रेल्वे स्थानक म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेलं, सर्वात वर्दळीचं, प्रवाशांचा सर्वाधिक ताण असलेलं स्थानक. ठाणे स्थानकाची ही ओळख लवकरच पुसली जाणार आहे. कारण तब्बल २० वर्षांपासून रखडलेल्या ठाणे रेल्वे स्थानक विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्तारीकरणात मोठा अडथळा बनलेल्या जागेचा प्रश्न राज्य सरकारनं निकाली काढला आहे. त्यामुळे लवकरच ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन कोपरी स्थानक तयार होणार आहे.


२० वर्षांपासून रखडपट्टी

ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान कोपरी रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला होता. पण या स्थानकासाठी जागेची अडचण निर्माण झाल्याने हा प्रकल्प कागदावरच राहीला. २० वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आरोग्य विभागाची जागा रेल्वेच्या ताब्यात येणं आवश्यक होतं.


 

मनोरुग्णालयाची जागा

ठाणे आणि मुलुंड स्थानकाच्या मधोमध मनोरुग्णालयासाठीची जागा आहे आणि हीच जागा रेल्वेला हवी होती. रेल्वेनं सरकारकडे तशी मागणी केली नि गुरुवारी आरोग्य विभागानं ही जागा देण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे कोपरी रेल्वे स्थानक प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून ही ठाणेकरणांसाठी मोठी खूशखबर असल्याची माहिती आ. निरंजन डावखरे यांनी 'मुंबई लाइव्ह'सोबत बोलताना दिली.


झोपड्या हटवणार

या जागेवर काही झोपड्या असून या झोपड्या हटवून पुनर्वसनाची जबाबदारी ठाणे महापालिकेवर टाकण्यात आल्याची माहिती आहे. तर या जागेच्या मोबादल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्यात येणार आहे. या जागेच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी प्रत्यक्षात जागा ताब्यात येऊन काम सुरू होण्यास बराच वेळ लागणार हेही तितकंच खरं.


जागेचा अडसर दूर

ठाणे आणि मुलुंड दरम्यान आम्हाला जागा हवी होती आणि तीच मिळत नसल्यानं प्रकल्प रखडला होता. पण आता जागेचा अडसर दूर झाला असून जागा ताब्यात आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरवात होईल. पण या प्रकल्पामुळे निश्चितपणे ठाणे रेल्वे स्थानकावरील भार हलका होणार आहे.
- नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वेहेही वाचा-

जीवघेणं 'ठाणे', साडेचार महिन्यांत ११२ बळी

ठाणे स्थानकात उलटं चाललं एस्कलेटर, ५ प्रवासी जखमीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा