Advertisement

जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल

'या' कालावधीत हे बदल करण्यात आले आहेत.

जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल
SHARES

जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ११ ते १४ डिसेंबर दरम्यान जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का पर्यंत जाणार आहे, अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे.

नौदलाच्या गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जल वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का( फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. मात्र त्यानंतर ही सेवा गेट वे पर्यंत सुरू करण्यात येते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.

उरण मधील मोरा आणि जेएनपीटी या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे. या दोन्ही सेवा बारमाही म्हणजे पावसाळ्यातही सुरू असतात. जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ही सेवा आठ महीने सुरू असते. ती पावसाळ्यात बदलून जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते.

त्याचप्रमाणे पावसाळ्यात जेएनपीटी लाँच सेवा ही रात्री दहा ऐवजी ९ वाजता बंद केली जाते. ती पुन्हा रात्री दहा वाजता पर्यंत सुरू राहील. या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीक ही प्रवास करीत आहेत.



हेही वाचा

बेस्ट बसमध्ये 'यांना' करता येणार मोफत प्रवास

बीएमसी मार्शल्सची आता मुंबईतील बेकायदेशीर पार्किंगवर नजर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा