Advertisement

तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल


तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
SHARES

सुपरफास्ट आणि अत्याधुनिक मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या एक्स्प्रेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. तेजसच्या फक्त वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र एक्स्प्रेसच्या थांब्यात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.



हे देखील वाचा -

'तेजस'मध्ये घ्या आता विकतचेच हेडफोन!



या वेळेत सुटणार तेजस एक्सप्रेस

करमळी येथून गुरुवारपासून गाडी क्रमांक 22120 तेजस एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता सुटेल ती मुंबईत संध्याकाळी 7.45 वाजता पोहोचणार आहे. यापूर्वी करमळी येथून 7.30 वाजता करमाळी-मुंबई अशी गाडी सोडण्यात येत होती. मान्सूनच्या काळात तेजस एक्स्प्रेस आठवड्याच्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी असे तीनच दिवस धावणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या अन्य गाड्यांच्या वेळेत मान्सूननुसार बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या एकतास आधी धावत आहेत.



हे देखील वाचा - 

नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा