Advertisement

मुंबई मेट्रोची धाव लवकरच नवी मुंबईपर्यंत!


मुंबई मेट्रोची धाव लवकरच नवी मुंबईपर्यंत!
SHARES

मुंबईत मेट्रोचे जाळे विणत मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए) कडून सुरू आहे. कुलाब्यापासून दहिसरपर्यंत तर वडाळ्यापासून ठाणे, कल्याण-भिवंडीपर्यंत मेट्रोने धाव घेतली आहे. आता ही मेट्रोची धाव नवी मुंबईपर्यंतही पोहोचणार आहे. कारण मेट्रो-8 अर्थात मुंबई विमानतळ-मानखुर्द-नवी मुंबई विमानतळ या मेट्रो मार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)कडून सुरू आहे. त्यानुसार सप्टेंबरपर्यंत हा सविस्तर आराखडा पूर्ण करत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


हेही वाचा - 

मेट्रोच्या रिटर्न तिकिटासाठी आता 5 रुपये जादा मोजा!

'जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर नाव द्या'


मुंबईत सध्या मेट्रो-3 कुलाबा-वांद्रे-सीप्झ आणि मेट्रो-7 दहिसर ते अंधेरी मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. दहिसर ते मिरारोड असा मेट्रोचा विस्तारही करण्यात येणार आहे. तर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो- 4 चे काम येत्या 3-4 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असून, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गही लवकरच मार्गी लागणार आहे. एकूणच मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने एकमेकांशी जोडत या दोन शहरांतील अंतर कमी केले जात आहे. मात्र त्याचवेळी मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर कधी कमी होणार? ही दोन शहरे मेट्रोने कधी जोडणार? याची प्रतिक्षा मुंबईकरांना होती. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ-मानखुर्द-नवी मुंबई विमानतळ या मेट्रो-8 चा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट), सविस्तर प्रकल्प आराखडा सप्टेंबरपर्यंत डीएमआरसीकडून पूर्ण करत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे.


हेही वाचा - 

ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

22 लाख पगाराच्या ट्री सर्जनच्या नियुक्तीचा फार्सच !


एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो-8 हा अंदाजे 35 किमीचा मार्ग असणार आहे. तर हा मार्ग अंशत: भुयारी आणि अंशत उन्नत असणार आहे. तर मेट्रो-3 आणि मेट्रो-7 या मेट्रो मार्गाशी हा जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ असा प्रवास मेट्रोने शक्य होणार आहेच, पण त्याचवेळी नवी मुंबई ते कुलाबा आणि नवी मुंबई ते दहिसर असा प्रवासही शक्य होणार आहे तो मेट्रो-8, मेट्रो-3 आणि मेट्रो-7 शी जोडली जाणार असल्यामुळे. दरम्यान, या प्रकल्पासाठी किती खर्च येईल? ही मार्गिका कशी असेल? आणि हा मार्ग कसा मार्गी लावला जाईल? हे सर्व सविस्तर आराखडा सादर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय