एल्फिन्स्टन-परळला जोडणारा नवा पादचारी पूल खुला

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत एल्फिन्स्टन रोड-परळ स्थानकांना जोडणारा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) खुला करून दिला आहे. या 'एफओबी'चं काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं.

SHARE

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिलासा देत एल्फिन्स्टन रोड-परळ स्थानकांना जोडणारा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) खुला करून दिला आहे. या 'एफओबी'चं काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं. २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन रोड 'एफओबी'च्या पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं की, या पादचारी पुलाचं काम पूर्ण झाल्याने हा ब्रिज प्रवाशांसाठी खुला करून देण्यात आला आहे. हा ब्रिज बनवण्यासाठी ९.८५ कोटी रुपयांचा खर्च आला. या ब्रिजचा एल्फिन्स्टन रोड आणि परळच्या प्रवाशांना फायदा होणार आहे.


ब्रिजवरील ताण हटणार

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नवीन ब्रिज सुरू झाल्याने या एल्फिन्स्टन आणि परळला जोडणाऱ्या इतर ब्रिजवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. हा नवीन 'एफओबी' १२ मीटर रुंद आहे. जुना ब्रिज ५ मीटर रुंद आणि ३२ मीटर लांब होता. तो १९७२ मध्ये बांधण्यात आला होता.


मागण्यांकडे दुर्लक्ष

हा ब्रिज बांधण्यास २०१६ मध्येच मंजुरी मिळाली होती. तसं झालं असतं तर कदाचीत चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळता आली असती. पण पश्चिम रेल्वे प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.


रचला इतिहास

या 'एफओबी'चं काम ७ नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आलं होतं. या ब्रिजसाठी टेंडर काढण्यात आल्यापासून ७ दिवसांच्या काम ब्रिजचं बांधकाम सुरू करण्यात आलं. ज्या गतीने हा ब्रिज बांधण्यात आला, रेल्वेच्या इतिहासात क्विचितच कुठलं काम इतक्या जलदगतीने झालं असेल.


एकूण ३ ब्रिज

हा 'एफओबी' खुला झाल्यापासून एल्फिन्स्टन आणि परळला जोडणारे आता ३ ब्रिज झाले आहेत. एक जुना ब्रिज, दुसरा लष्कराने बनवलेला ब्रिज आणि तिसरा नवा खुला झालेला ब्रिज.हेही वाचा-

उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडिट - रेल्वेमंत्री

पूल कोसळण्याची वाट कसली बघता? न्यायालयाचे महापालिकेला खडे बोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या